शनिवार (दि 01)पासुन सिल्लोड शहरात आमदार आपल्या दारी अभियान ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 30 नवंबर 2018

शनिवार (दि 01)पासुन सिल्लोड शहरात आमदार आपल्या दारी अभियान ;


सिल्लोड (प्रतिनिधी)दि 29/11/2018.
शनिवार (दि 01)रोजी पासुन सिल्लोड शहरात आमदार आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानात माजीमंञी आ. अब्दुल सत्तार सिल्लोड शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे जागेवरच निवारण करण्यासाठी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर ,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,गटनेता नंदकिशोर सहारे,व सर्व पदाधिकारी,अधिकारी व कर्मचा-यांसोबत शहरातील नागरिकांच्या दारोदार जाऊन नागरिकांच्या विविध अडी अडचणी समस्या जाणून घेत मुलभूत सुविधा व इतर समस्यांचे निवारण जागेवरच करण्यात येणार आहे.
आमदार आपल्या दारी या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवित आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात असे आवाहन सिल्लोड शहर व तालुका काँग्रेस,युवक काँग्रेस व महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें