सेलू प्रतिनिधी.समशेर खान.
सेलू (20) दिल्ली येथे राष्ट्रीय स्वतंत्र्य सीबीएसई संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. जी.पी.गुप्ता यांनी डाॅ. संजय रोडगे यांनी कमी कालावधीत जी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी व शैक्षणिक दर्जा वाढीसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय स्वतंत्र्य सीबीएसई संघटना नवी दिल्ली उपाध्यक्ष व महाराष्ट्र मुख्य प्रभारी पदी निवड करण्यात आली.
यावेळी बोलतांना मा. श्री. जी. पी. गुप्ता डाॅ. रोडगे यांची शिक्षण क्षेत्रात असलेली जिद्द व चिकाटीचे उदाहरण देतांना त्यांनी जगामध्ये प्रसिद्ध असलेली शिक्षण पध्दती म्हणजे फिनलॅन्ड शिक्षण पध्दतीचा तेथे जाऊन त्या शिक्षण पध्दतीचा अभ्यास करून तसेच ईतरही देशातील शिक्षण पध्दती यांचा एकत्रित अभ्यासक्रम तयार करून घेऊन तो सॅनरो एज्युकेअर प्रा. ली. या शैक्षणिक कंपनी अंतर्गत क्युरिअस किड्स या प्रिस्कुल मध्ये सुरू केला. महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक संस्थेने शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केल्याबद्दल पुरस्कारीत करण्यात आलेले आहे. यामुळेच त्यांना राष्ट्रीय स्वतंत्र्य सीबीएसई संघटना नवी दिल्ली उपाध्यक्ष व महाराष्ट्र मुख्य प्रभारी पदी निवड करण्यात आली असे सांगितले.
या निवडीबद्दल प्रिन्स अकॅडमीच्या पालकांतर्फे परतुरचे श्री. संतोष चव्हाण, प्रा. वायाळ सर,मानवतचे गोविंद राठी, जयप्रकाश मंत्री, डाॅ. काकडे सर, मंठा येथील डाॅ. हिवरे व श्रीराम प्रतिष्ठान संचलित सर्व विभागातील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वागत सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या निवडीबद्दल प्रिन्स अकॅडमीच्या पालकांतर्फे परतुरचे श्री. संतोष चव्हाण, प्रा. वायाळ सर,मानवतचे गोविंद राठी, जयप्रकाश मंत्री, डाॅ. काकडे सर, मंठा येथील डाॅ. हिवरे, बाजीराव मोगल, संदिप चंद्राते व संतोष राऊत आदि दिसत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें