प्रा.गोविंद लहाने यांचा अभ्यास गटात समावेश.
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.११नोव्हेंबर २०१८
भूतान येथील जागतिक पर्यावरण सम्मेलन व पर्यावरण अभ्यास दौऱ्याचे पुणे जिल्ह्यातील दौण्ड येथे उत्साहात उद्घाटन करण्यात येवून पर्यावरण सम्मेलन व अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेले पर्यावरणप्रेमी भूतान देशात पर्यावरण अभ्यास दौऱ्यासाठी नुकतेच रवाना झाले आहेत. या उद्घाटन कार्यक्रमास सकाळ समुहाचे उपसंपादक व सिने दिग्दर्शक राज काझी, नाट्यकर्मी व सिने अभिनेते शैलेश पीतांबरे, दौण्डचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, दौण्डच्या नगराध्यक्षा शितलताई कटारिया, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबसाहेब मोरे, कुकडी साखर कारखान्याचे मा.व्हा.चेअरमन सुभाषराव डांगे, भीमथडी शिक्षण संस्थेचे चेअरमन विक्रमशेठ कटारिया, डॉ.विजय बगाडे, प्रमोद काकडे, प्रमोद मोरे, धीरज वाटेकर, विलास महाडीक, बाळासाहेब जठार, तुकाराम अडसूळ, गोरखनाथ शिंदे, भाऊसाहेब सोनवणे, वैभव मोरे यांच्यासह भूतान अभ्यास दौऱ्यात सहभागी होणारे सर्व पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व निसर्ग व सामाजिक पर्यवार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने भूतान देशात जागतिक पर्यावरण सम्मेलन व पर्यावरण अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. हा अभ्यास दौरा १० नोव्हेंंबर ते १९ नोव्हेंबर २०१८ पर्यंत चालनार आहे. या अभ्यास दौऱ्यात सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.गोविंद लहाने यांचाही समावेश असुन; भूतान देशात दहा दिवसात तेथील पारो शहराची पाहणी करुण चर्चासत्र, भूतान देशातील कायदा आणि पर्यावरण संरक्षण धोरण याविषयी चर्चा सत्र, थिंपू शहराची पाहणी, भूतान देशातील इतिहास धर्म शिक्षण तेथील जनतेची आनंदी जीवनशैली अभ्यासने याचबरोबर भूतान देशातील निसर्ग व मानवी जीवन पद्धती, भूतान देशातील सेन्द्रिय शेती व औद्योगिकरण पाहणी व चर्चासत्र होणार आहेत. या पर्यावरण सम्मेलनाचा व अभ्यास दौऱ्याचा समारोप २० नोव्हेंंबर रोजी राळेगण सिद्धी येथे पद्मभूषण अण्णा हजारे, महाराष्ट्र शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव ई.रवींद्रन, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी. अंनबलगन व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे महाव्यावस्थापक विजयकुमार ठुबे यांच्या उपस्थितीत होनार असल्याचे पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें