सेलूत उपचार दरम्यान मातेसह बाळ दगावले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 12 नवंबर 2018

सेलूत उपचार दरम्यान मातेसह बाळ दगावले.


सेलू प्रतिनिधी.शमशेर खान.
सेलू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय
हे नाव कानी पडले की, हे रुग्णालय सिझर व बाळांतपणासाठी खूप प्रसिध्द आहे.तसेच त्याठिकाणी वैधकीय आधिक्षक यांनी पुरस्कारही मिळवले. एवढ्यावरच न थांबता परभणी जिल्ह्यातील सिझर करण्यासाठी चढाओढ ही लागली. त्यातही येथील डॉक्टरांना यश मिळाले. मात्र शनिवार,१0 नोव्हेंब रोजी दुपारी २ ते ३ च्या सुमारास बाळंतपणासाठी आलेली महिला व बाळ दगावल्याची घटना घडली. याचे कारण मात्र अस्पष्ट असल्यामुळे चर्चेला
उधाण आले आहे
सेलू तालुक्यातील डासाळा येथील रहिवाशी असणारे व जालना जिल्ह्यातील सातोना येथे पोट भरण्यासाठी गेलेले कुटुंब
मानिषा गजानन गजमल ही महिला व बाळ जन्माला येण्याअगोदरच त्यांचा मृत्यू
झाल्याची घटना उपजिल्हा रुग्णालय सेलु येथे घडली. ज्या रूळणालयाचे नाव जगभर प्रसिद्ध होते त्याच नावाला काळे फासल्या
गेले. ही महिला सातोना येथून दुपारी बाळंतपणासाठी आली होती. तिचा विश्वास
होता की सेलु येथे शासकीय रूग्णालय खुप
चांगले असुन येथेच आपल्या बाळाला
जन्म चांगला होवू शकतो. मात्र येथे वेळेवर उपचार मिळाला नाही की, डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाला? याचा अजुन मेळ
बसलेला नाही. तसेच या महिलेस संध्याकाळपर्यंत का ठेवले? व उशीरा।
नातेवाईकांच्या ताब्यात शवविच्छेदन करून
बाळासह आईचा मृतदेह दिला. एकतर गरीब घरातील हे कुटुंब असुन त्यांना कुठल्याच गोष्टीची कसलीही महिती नव्हती. जसे डॉक्ट सांगत होते, तेच त्यांना खरे वाटत होते. पोलिसांना जसा जवाब द्यायचा तसाच ते देत होते. गरीब कुटुंबातील महिला बाळंतपणासाठी आली अन् बाळासह दगावली. ही घटना सरळसाधी वाटत असली तरी गोरगरीब जनता शासनाच्या रुग्णालयात विश्वासाने जाते त्या विश्वासालाच आज तडा गेल्याची बाब समोर आली आहे. हेच कुटुंब बडे राहिले असते तर डॉक्टरांनी याच पद्धतीने वर्तणूक केली असती काय?असा प्रश्न निर्माण होतो. एकंदर या प्रकरणाची आरोग्य मंत्र्यांमार्फत सक्षम यंत्रणेने चौकशी करावी अशी अपेक्षा सुजाण नागरिकांतून व्यक्त होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें