संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा - गणेश जयतपाल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 27 नवंबर 2018

संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा - गणेश जयतपाल.


सोनपेठ : संविधान हे भारतीय लोकशाहीचा आत्मा असून संविधानाचे रक्षण करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे मत संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान जागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सुनिता टेंगसे, प्रा. डॉ. मुक्ता सोमवंशी होत्या तर प्रमुख उपस्थितीत विद्या धोंडगे, ज्योत्स्ना आरगडे, अर्चना वाकणकर व प्रांजल भोसले होत्या.
शहरातील जिजामाता पब्लिक स्कूल व जिजाऊ ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने संविधान जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. गणेश जयतपाल हे होते. यावेळी बोलताना प्रा. डॉ. मुक्ता सोमवंशी यांनी संविधानातील मुलभुत हक्क व कर्तव्य याबद्दल सविस्तर माहीती दिली, संविधान निर्मितीमध्ये महिलांचा सहभाग या विषयावर प्रा. डॉ. सुनिता टेंगसे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्रा. गणेश जयतपाल यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात असून संविधान हे लोकशाहीचा आत्मा आहे, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी सुत्रसंचालन वर्षा मोहरीर, प्रास्ताविक  झाकीरोद्दीन शेख तर आभार संध्या भोसले यांनी मानले, स्वागतगीत राणी कदम, गितांजली कदम, संविधान वाचन सांची वाघमारे, वैभव रत्नपारखे, मनोगत पुजा गावडे यांनी केले. तसेच अनुष्का वाकणकर, प्राची सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त लहुकुमार वाकणकर यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले, याप्रसंगी शिक्षक, विद्यार्थी व महिलांची मोठी उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें