आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांचे सांत्वन;
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 23/11/2018.सिल्लोड तालुक्यातील आसडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांस माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन कुटूंबियांचे सांत्वन करीत भाजप सरकार शेतकरी - शेतमजुर - नागरिकांना नुसतीच आश्वासने देत असुन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांसाठी सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याची खंत व्यक्त केली.
सलग तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून आसडी येथील तरुण शेतकरी हरिदास ञ्यंबक सुरडकर (वय 35)यांनी रविवारी राञी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांस तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिका-यांना सांगितले .
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना भेट देऊन सांत्वन करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतीश ताठे,सलिम हुसैन,राजुमिया देशमुख,निजाम पठाण,संजय मुरकुटे, विनोद गायकवाड,विठ्ठल सुरडकर,फकिरबा सुरडकर,भिकन मिरगे,सुधाकर मिरगे,भागवत मिरगे,आदिंसह नागरिकांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें