कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कॉंग्रेस अल्पसंख्यक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नदिम जावेद यांच्या आदेशानुसार या वेळी देशभरामध्ये भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात आले।त्याचाच एक भाग म्हणुन मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे सायंकाळी ६.३० वाजता काँग्रेस अल्पसंख्यक विभाग व जनजागरण समिति यांच्या वतीने एक शाम मौलाना आझाद के नाम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते।या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात जेष्ठ उर्दू साहित्यिक डॉ.मिर्झा खिजर बेग हे होतो।तर प्रमुख उपस्थिति मध्ये औरंगाबाद शहर कॉंग्रेस अध्यक्ष नामदेवराव पवार, माजी आमदार नितीन पाटील, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस शाह आलम शेख व काँग्रेस अल्पसंख्यक विभागाचे प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ते एकबाल सिद्दीकी, डॉ.जफर खान, हमद चाऊस, इब्राहीम पठाण, शेख युसुफ, मोहसिन अहेमद, डॉ.पवन डोंगरे, रमजानी खान, आबेद बेगम, मिर हिदायत अली हे होते।या प्रसंगी लहान विद्यार्थियांनी विविध राष्ट्रपुरुषांचे वस्त्र परिधान करुन हाताता तिरेंगा घेवुन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले।यावेळी डॉ.अजिज इरफान व अहेमद एकबाल या उर्दू साहित्यीकांनी मौलाना आझाद यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला तर शायर अब्दुल सत्तार संगदिल व शायर शहेद खान यांनी आपल्या शायरीतुन देशाच्या वर्तमान स्थितिवर कवितेच्या माध्यमातुन उपस्थितांचे मने जिंकली तर प्रमुख पाहुणे शाह आलम व एकबाल अहेमद सिद्दीकी यांनी आपल्या भाषणातुन सत्तापक्षाच्या सावत्रपणाच्या भुमिकेबद्दल व अल्पसंख्यक समाजावर होत असलेल्या अन्यायाबद्दल जोरदार टिका केली।या कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबाद जिल्हा व शहर कॉंग्रेस अल्पसंख्यक विभागातर्फे करण्यात आले होते।कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अल्पसंख्यक विभागाचे शहर अध्यक्ष खालेद पठान यांनी केले।तर आभार प्रदर्शन जिल्हाअध्यक्ष नासेर नज़ीर खान यांनी केले।कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्पसंख्यक विभागाचे पदाधिकारी हाजी मोईन कुरेशी, अब्दुल अजीम, शेख दस्तगीर, इम्रान पठान, माजीद पठान, अॅड.क्षितिज रोडे, शोएब अबदुल्ला शेख, माजीद पठान, अजहर शेख, डॉ.शादाब शेख, आमेर शेख, आदिंनी परिश्रम घेतले।यावेळी मोठ्या संख्याने नागरीकांची व अल्पसंख्यक समाजातील मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचा-यांना मानना-या चाहत्यांची गर्दी होती।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें