सोनपेठ (राजेश खेडकर)
पाथरी, मानवत, सेलू आणि सोनपेठ तालुक्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ज्येष्ठ मान्यवरांना जिवनगौरव पुरस्कार व विविध क्षेत्रातील यशस्वी मान्यवरांचा सन्मान सोहळा श्री साई स्मारक समिती पाथरी, राष्ट्रभक्ती संस्करण फाऊंडेशन पिंपरी चिंचवड व ओंकार सेवाभावी संस्था पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोप वर्ष व राष्ट्रपिता महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे दि. ०८नोव्हेंबर २०१८ रोजी आयोजीत करण्यात आला असल्याचे संयोजक डॉ.जगदिश शिंदे व इंजि.नितीन चिलवंत यांनी कळविले आहे.
सोनपेठ तालुक्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नऊ मान्यवरांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असुन यामध्ये लोप पावत असलेली वाचन संस्कृती जोपासलीजावी व शालेय जीवनातूनच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी प्रयत्नरत असलेल्या सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्या सहाजनांचा समावेश आहे. सत्कारमुर्तीत मा.आ.व्यंकटराव कदम (राजकीय, सामाजिक क्षेत्र), सतिशराव देशमुख (पत्रकारिता), मा.प्राचार्य माणिकराव निलंगे (शैक्षणिक दर्जा ), ह.भ.प. गोपीनाथराव पवार (सांप्रदायिक, अध्यात्मिक), बालमुकुंदजी सारडा
( सार्वजनिक कार्य), इंजि. चंद्रकांत लोमटे (सामाजिक कार्य), भुजंगराव हुंबे (ग्रामीण सामाजिक कार्य), मेजर गौतम गायकवाड (भारतीय सैन्यातील सेवा), मुंजाभाऊ खोसे (क्रिडाक्षेत्र ) यांचा जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असुन तालुक्यातील विविध क्षेत्रातील यशस्वीतेसाठी चंद्रकांत राठोड, बालाप्रसाद मुंदडा, ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले, प्रा.डॉ.मारोती कच्छवे, शिवमल्हार वाघे, आशोक खोडवे, डी. के. पवार, राजेश्वर खेडकर, महेश जाधव, महेश कोरडे, बापुराव शिंदे, डॉ.महेश बाहेती, ज्ञानेश्वर भंडारे, श्रीराम राठोड, डॉ.मोहन देशमुख, सुधीर बिंदू, डॉ.भगवान कोरडे, डॉ.भगवान देशमुख, राकेश मेहता, शेषेराव राठोड, सचिन काटे आदींचा सन्मान करण्यात येणार आहे. असे प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. जगदिश शिंदे, इंजि. नितीन चिलवंत यांच्याकडून कळविण्यात आले आहे.
या पुरस्काराबद्दल सोनपेठ शहरातील सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें