नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी नगरपरिषद कर्मचा-यांची घेतली हजेरी;पहाटेच नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केला पाहणी दौरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 5 नवंबर 2018

नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी नगरपरिषद कर्मचा-यांची घेतली हजेरी;पहाटेच नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केला पाहणी दौरा.


सिल्लोड (प्रतिनिधी)दि 05
नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सोमवारी सकाळी साडे पाच वाजता अचानक वार्डा - वार्डातील स्वच्छतेसंदर्भात पाहणी करीत स्वच्छता करणा-या कर्मचा-यांची हजेरी घेत परिसर स्वच्छतेसंदर्भात काळजी घेण्यात यावी व आपली जबाबदारी कर्तव्याने पार पाडावी,कामात हलगर्जीपणा व चालढकल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यवाहिस सामोरे जावे लागेल असा इशाराही नगरपरिषद कर्मचा-यांना देण्यात आला तसेच नागरिकांनी आपापल्या घरासभोवतालचा परिसर स्वच्छतेसंदर्भात काळजी घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले

सोमवारी सकाळी 5:30 वाजेपासून स्वतः नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, घंटागाडी,लाईट,आणि विविध सुविधेबाबत प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला. बालाजी नगर, शिक्षक कॉलनी,समता नगर, शिवाजी नगर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भेटी दिल्या. या भेटी दरम्यान नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देखील केले.नगराध्यक्ष अब्दुल समीर यांची कार्यतत्परता बघून वार्डा - वार्डातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.यावेळी उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बनसोड ,नगरसेवक विठ्ठलराव सपकाळ, रईस मुजावर पठाण, राजरत्न निकम ,सत्तार हुसैन,विठ्ठलराव दोरखे , पाथ्रीकर,शे.अझीम व नगरपरिषदेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें