बदनापूर (प्रतिनिधी)
जीवनातील निर्माण झालेल्या अशांती चे उच्चाटन करण्यासाठी पवित्र कुराणाचा आचरण करणे आवश्यक आहे असे बदनापूर तालुक्यातील मदरसा जामिया अबुहुरैर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना मौलाना इस्माईल यांनी सांगितले .
बदनापूर तालुक्यातील मदरसा जामिया बहुरैरा येथे 35 हाफिज बनलेल्या विध्यार्थ्यांना पुढील जीवनात उज्वल भविष्य जगण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमा मध्ये मोठ्या प्रमाणावर लोक उपस्तीत होते ज्यात प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना इस्माईल पटेल,मौलाना जावेद ,मौलाना इस्माईल नवाब ,मौलाना शाहीद परभणी तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष बदनापूर तालुक्यातील मदरसा जामिया अबुहुरैरा येथील नाझीम मौलाना कारि मोहम्मद अली तसेच विद्यार्थी व गावातील लोक मोठ्या प्रमाणावर उपस्तीत होते.
पुढे मौलाना इस्माईल यांनी सांगितले की देशात निर्माण झालेल्या समाजवाद,चंगळवाद,राष्ट्रवाद नष्ट करण्यासाठी देशातील ,समाजातील लोकांनी आपल्या जीवनात क्षमा करण्याची व क्षमा मागण्याची वृत्ती अंगीकार करणे आवश्यक आहे कारण कुटुंबातील वाद ,समाजातील वाद हे गैरसमजाणे निर्माण झालेले असते जर व्यक्तींनी मधुर वाणी ने ,प्रेमाने ,माफी मागितली किंवा कोणी माफी मागत असेल तर त्याला माफ केले तर निर्माण झालेल्या वाद संपुष्टात येईल व घरातील व समाजातील निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती नष्ट होऊन घरात व समाजातील लोक आनंदाने जीवन जगण्यास चालना मिळेल.
द्वेष,मत्सर,लालसे पोटी मानवी जीवनात निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत व्यक्तीने जीवनात क्षणिक सुखासाठी सत्याची कास न सोडता कृती करणे आवश्यक आहे करण याच्या शिवाय मानवी जीवनात आनंद निर्माण होत नाही.
देशातील अखंडता, एकता राखण्यासाठी प्रत्येक समाजातील व्यक्तींनी आपली श्रेष्ठत्व मी काही आहे सोडून प्रत्येक समाजातील सर्व लोक कश्या रीतीने एकत्र येतील यासाठी आपली भूमिका जबाबदारीने बजावणे खूप गरजेचे आहे. जे ने करून संपूर्ण देशात आपल्या देशाचे महत्वाचे स्थान निर्माण करण्यासाठी मोलाचे योगदान करणे आवश्यक आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें