मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.१७ : हजरत टिपु सुलतान यांच्या २६८ वी सार्वजनिक जयंती मानवत शहरात २० नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी करुन टिपुसुलतान चौक येथे ५० युवकांनी यावेळी रक्तदान केले. युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते टिपुसुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन उदघाटन करण्यात आले यावेळी बालुभाऊ कुराडे ,विनोद राहाटे,अन्वर भैय्या शेख ,वाजेद शेख,ईरफान खान,शेख शफिक ,महेन्द्र ठेंगे ,गौतम जमदाडे आदी उपस्थीत होते.शासकिय विश्रामगृह येथुन या मिरवणुकिस सुरुवात होऊन मेनरोडमार्ग पोलीस ठाणे पासुन टिपु सुलतान चौक पर्यत पायी वाजत गाजत मिरवणुक काढुन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . टिपुसुलतान चौक येथे ५० युवकांनी यावेळी रक्तदान केले.या जयंतीत युवक मोठ्याप्रमाणात उपस्थीत होते यावेळी कार्यदक्ष पोलीस निरीक्षक मिना कर्डक यांनी चोख पोलीस बंदोबंस्त ठेवला होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें