सेलू प्रतिनिधी.दि.19/11/2018.
मुस्लिम समाजाला महेमुदउर्ररहेमान समितीने शिफारस केल्यानुसार व महाराष्ट्र शासनाने 9 जुलै 2014 रोजी एका अद्यादेशाद्वारे जाहीर केलेला, मा. उच्च न्यायालयाने मान्य केलेला आरक्षण तात्काळ देण्यात यावे अशी मागणी मुस्लिम युवक परीवर्तन समिती तर्फे शेख महेमुद यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालय सेलू येथे धरणे ऑदोलन करुन एका निवेदनाद्वारे मा. मुख्यमंत्री,महाराष्ट्र शासन यांना मागणी करण्यात आले. निवेदनावर शेख महेमुद, नगराध्यक्ष विनोद बोराडे, शाहेदलाला, पठाण करीम, मुताहेर खॉन, शेख जमीर, सय्यद दिलदार बेलदार, सय्यद ईसाक, नगरसेवक शेख रहीम , नगरसेवक पठाण रहीम, रफीक बेलदार, पत्रकार अबरारबेग,पत्रकार पठाण ईलियास, इरफान जमींदार, हसन खॉन, अजहर पठाण,शेख आरेफ पत्रकार, आमेरलाला, शोहेब हाश्मी, सोहेल घौरी सह ईतरांची स्वाक्षरी आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें