साई मंदिर व परिसराचे भगवी कारण थांबवा शिर्डी ग्रामस्थानची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 27 नवंबर 2018

साई मंदिर व परिसराचे भगवी कारण थांबवा शिर्डी ग्रामस्थानची मागणी.


शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दूनबळे.
शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात  भगवीकरण असल्याचे चिञ दिसत असुन द्वारकामाई मंदिर हे नाव पुर्वीप्रमाणे द्वारकामाई मज्जीद असे करावे या आशयाचे निवेदन शिर्डीतील विविध धर्मीय समाजबांधवांनी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेला दिले आहे..
श्री साईबाबा संस्थानच्या कार्य अधिकारी रुबल अग्रवाल यांना हे निवेदन देण्यात आले असुन साईबाबांनी संपुर्ण जगाला एकात्मतेसाठी सबका मालिक एक हा संदेश देऊन  सर्व धर्म समभावाची शिकवण दिली. या संदेशाचे पालन करतांना काही बदल होत असल्याने हे     बदल त्वरित थांबवून पुर्वीसारखी  साईंची शिकवण जोपासावी असे निवेदनात म्हणले आहे..
गेल्या दोन वर्षापासुन साईमंदिर आणि परिसरातील पुर्वीचे दिशादर्शक आणि माहितीचे सर्व फलक हटवून भगव्या रंगाचे फलक लावण्यात आले आहे त्यामुळे भाविकांमधे गैरसमज निर्माण होत आहे असे निवेदनात म्हणले असुन हे फलक पुर्वीप्रमाणे असावेत अशी मागणी शिर्डीतील विविध धर्मातील नागरिकांनी केलीयं.
श्री साईबाबा संस्थानच्या कार्य अधिकारी यांनी याविषयी बैठकीत विषय घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे यावेळी निवेदन कर्त्यांना दिलेय..या निवेदनावर जावेद शेख,अरविंद कोते , कैलास कोते , समीर शेख,रज्जाक शेख,जमादार इनामदार ,  आदीसह शिर्डीतील  नागरिकांची नावे आहेत..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें