सेलू! प्रतिनिधी
तालुक्यातील देऊळगाव गात येथील शाळे जवळ असलेले रोहित्र जळाल्यामुळे गावात पंधरा दिवसापासून अंधार असून या रोहित्रा मुळे गोवर, रूबेला च्या सर्वच लशी सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आल्याने लसीकरण कार्यक्रमात देखील अडचण निर्माण झाली आहे. तर येथील एका बँकेच्या दैनंदिन कारभाराला देखील अशीच अडचण उद्भवली आहे. तालुक्यात सर्वात मोठे गाव असलेल्या देऊळगाव गात येथील रोहित्र मागील पंधरा दिवसांपासून काँईल व आईलच्या कमतरतेमुळे निकामी झाले आहे. नवीन रोहित्र जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे ही अडचण निर्माण झाली असल्याचे कळते. पंधरा-पंधरा दिवस रोहित्राच्या दुरुस्तीमुळे गाव अंधारात आहे. परंतु रोहित्र बदलून मिळाले नाही की दुरुस्ती करण्यात आले नाही.
लसीकरण मोहिमेलाही आडचण - डॉ सोनवणे
देऊळगाव येथील रोहित्र जळाल्यामुळे आरोग्य केंद्रातील डी फ्रिज बंद आहेत. २७नोव्हेंबर पासून गोवर रूबेला हि लसीकरण मोहीम सुरू होत असून देऊळगाव आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या १२हजार१११ लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लस सेलू च्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.एम.सोनवणे यांनी दिली. रोहित्र सुरू होईपर्यंत लशी ने-आन करण्याचा फटका या मोहिमेला देखील बसला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें