सेलू प्रतिनिधी.शहेबाज़ खान.
जिंतूरच्या सायकल सवारांनाचा अभिनव उपक्रम.
100 कि.मी. लांब पाल्याचा सायकल प्रवास केला पूर्ण.
जिंतूर व येलदरी येथील पाच सायकल पट्टूनी पर्यावरण समतोल, वाढते प्रदूषण रोखथांब तसेच आरोग्याच्या सुदृतेकरिता सायकल चालविण्याचे संदेश देण्यासाठी जिंतूर-सेलू-जिंतूर मधील तब्बल 100 किमीचा प्रवास सायकल द्वारे पूर्ण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून सेलूकरांनी सायकल सवारांचा गौरव केला आहे.जिंतूर-सेलू मतदार संघात वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुदृढ शरीर संपत्ती निर्मिती करण्याकरिता तसेच नागरिकांमध्ये सायकल चालविण्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी जिंतूर शहर व येलदरी येथील सायकल पट्टू मागील एक वर्षापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. एवढेच नव्हे तर यामधील सायकल पट्टूनी विदर्भातील वाशिम येथे फ्रांस देशाकडून आयोजित करण्यात आलेल्या 200, 600 सायकल स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवत स्पर्धेत घवघवीत यश मिळवून तालुक्याचा नाव जगाच्या पाठीवर कोरला आहे. शिवाय मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे आयोजित 200 किमी ब्रेवेट स्पर्धेत जिंतूरच्या चार सायकल पट्टूनी सहभाग घेत औरंगाबाद-अहमदनगर-औरंगाबाद हा साडे तेरा घंट्याचा सायकल प्रवास अवघ्या बारा तासात यशस्वी पूर्ण करून औरंगाबाद येथे जिंतूरचे नाव चमकीवले आहे. तसेच रविवारच्या सुट्टीचा सदोपयोग म्हणून जिंतूरच्या पाच सायकल सवारांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याकरिता अभिनव उपक्रमातून जिंतूर-सेलू-जिंतूर हा 100 किमीची अंतर सायकलने पूर्ण करून सेलूकरांना पर्यावरण संरक्षणाचा महत्त्व पटवून दिले. या अभिनव उपक्रमात प्रमोद भालेराव, भिसे, डॉ सुमेर मोहारे, व्यंकटेश भुरे, शहेजाद खान, गुलाब नहातकर या सायकल सवारांचा समावेश होता. याप्रसंगी सेलू येथील बाळु गिलडा,शिवनारायन मालानी,सुनिल गायकवाड, पत्रकार राम सोनवणे,इलीयास महमंद, दिलीप डासाळकर, नाईक सर ,नाल्टे आदीच्या वतीने त्यांचे गौरव करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें