आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा कुटुंबाला आर्थिक मदत... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 14 नवंबर 2018

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा कुटुंबाला आर्थिक मदत...



अनवर पठान.वालुर.दि14/11/2018.
सेलु तालुक्यातील वालुर येथील शेतकरी  मोहम्मद रशीद मोहम्मद नुर अन्सारी वय 47 वर्ष या शेतकऱ्यानी दि.13 नोव्हेंबर रोजी सततची नापिकी व दुष्काळी परिस्थितीमुळे सेलुतील विटभट्टि भागात रफिक सौदागर यांच्या पडिक शेतात झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केले होते याची माहिती मिळताच शिवसेनेचे विधानसभा प्रमुख राम पाटील यांनी कुटुंबाचे सांत्वन करून रोख दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

 मागील तीन वर्षांपासून सतत शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असून कर्जाचा वाढत चालला डोंगर यामुळे शेतकरी चिंता ग्रस्त झाला आहे यातूनच तालुक्यातील वालुर येथील शेतकरी मोहम्मद रशीद अन्सारी यांना जेमतेम तीन एकर शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असत मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने  यामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली परिणामी दुष्काळी परिस्थिती काही शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही त्यामुळे आत्महत्याला बळी पडाव लागत याची जाणीव लक्षात घेऊन शिवसेनेचे सेलु जिंतुर विधान सभा प्रमुख.तथा जि.प.गटनेते राम नाना पाटील यांनी त्यांच्या कुटुंबाला 10 हजार रुपयाची रोख आर्थीक मदत केली यावेळी ,अतुल डख, लिंबाजी कलाल,सलिम कुरेशी,शे.इसाक अन्सारी,मो.मारुफ अन्सारी,फेरोज पत्रकार,बालाजी खिस्ते,अनवर पठाण(पत्रकार) आदि उपस्थिती होते.त्याच्या पश्चात पत्नी 2 मुली 1 अपंग मुलगा 4 भाऊ,एक बहिन असा परिवार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें