रस्ता मजबुतीकरण - नुतनीकरण कामांचे आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उदघाटन;
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 23/11/2018.सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव - धोञा - शिवना - आमसरी - वाघेरा - वडाळी - नाटवी रस्त्याचे मजबुतीकरण व नुतनीकरण कामांसाठी कामांसाठी 385 . 00 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला असून ही कामें तात्काळ सुरु करा असेही संबंधित अधिका-यांना सांगण्यात आले. गुरुवार (दि 22)रोजी सदरील कामांचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद - उपविभाग सिल्लोड अंतर्गत गोळेगाव - धोञा - शिवना - आमसरी - वाघेरा - वडाळी - नाटवी या रस्ता कामांसाठी माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या विशेष प्रयत्नातून 385 .00 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला असून सिल्लोड तालुक्यातील धोञा - शिवना चौफुली रस्त्यावर या कामांचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देविदास पाटील लोखंडे , सलिम हुसैन,सतिश ताठे, राजु बाबा दौड , संदिप राऊत, राजुमिया देशमुख,निजाम पठाण,विक्रांत दौड, संजय मुरकुटे, शेख सलिम, आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें