सेलू प्रतिनिधी.
सेलू : पालकत्व हे आनंदायक असून ही एक जबाबदारी आहे. पालकांनी आपल्या मुलांचे मालक नाही तर खय्रा अर्थाने पालक व्हावे.असे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.आनंद नाडकर्णीं यांनी व्यक्त केले. ते शिक्षण विभाग पंचायत समिती, शब्दसह्याद्री प्रतिष्ठान आणि नवरचना प्रतिष्ठान च्या संयुक्तविद्यमाने बालक पालक शिक्षक संवादातंर्गत नूतन विद्यालयाच्या प्रार्थना मैदानावर आयोजित या मुलांशी वागावे तरी कसे ? या विषयावर शुक्रवार दि. २३ रोजी बोलत होते. पुढे आपल्या भाषणात डॉ.आनंद नाडकर्णीं म्हणाले की,' पालकत्व ही आपल्या विकासाची संधी असल्याने पालकांनी आपल्या मुलांशी कृतज्ञ असले पाहिजे.कारण त्यांच्याचरूपाने कर्मयोग जगायची संधी पालकांना मिळत असते. मुलांचा कल लक्षात घेऊन आपल मुल अंक,रंग,रचना,यंञ अशा चौसष्ट कलांपैकी ज्याच्याशी एकरूप होइल त्याला त्याच्या क्षेत्रात विकासासाठी प्रोत्साहन द्यावे. मुलांशी त्याच्या आवडीचा संवाद वाढवावा.मुलांशी मिञत्वाच नात दृढ करावे.' कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.विनायक कोठेकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी,श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे,भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संजय लोंढे,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे,रघुनाथ बागल यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी,उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, शहरातील शिक्षक,पञकार,डॉक्टर,वकील, साहित्यिक,सामाजीक कार्यकर्ते, पालक,बालक अशा श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य प्रल्हाद मोरे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय शरद ठाकर यांनी करून दिला.सुञसंचालन सुरेश हिवाळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रविण खंदारे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्जेराव लहाने,रामराव गायकवाड,रामराव बोबडे,तालूका गट समन्वयक सुनीता काळे, किशन कटारे,काशिनाथ पल्लेवाड यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें