जिंतूर----शेवटी सत्याचा विजय होतो अखेर मा न्यायालयाने न्याय दिला व मला दोषमुक्त केले अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष सलिम पहेलवान यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदे मध्ये दिली त्यांनी असेही सांगितले की स्थानिक पोलीस प्रशासन राजकीय दबावा खाली मला हेतुपुरस्कर लक्ष करत जिल्हाधिकारी यांची दिशाभुल करत माझ्या वर एमपीडी अंतर्गत कार्यवाही केली आहे असा असा पोलिसा वर सलीम पहेलवान यांनी भर पत्रकार परिषदेत आरोप लावून सर्वाना अचंबित केले एमपीडी च्या कार्यवाहीतुन मुक्तता झाल्या नंतर ते भावनिक होऊन जाहीर पत्रकार परिषदेत बोलत होते त्यांनी असेही सांगितले की शहरातील एलदरी रोड वरील बद्दलच्या वादात निकाल 2013 मध्येच माझ्या बाजूने लागला असून या निकाला विरोधात स्थानिक पोलीस प्रशासन मा सत्रन्यायालयात गेले दुसरे प्रकरण शहरातील भाजी मंडई मधील असून येथील 140/ छ मधील जमीन बाबत असून ही मालमत्ता सुद्धा माझ्या कुटूंबियाच्या नावे असून त्याब्यात आहे पण काही प्रस्थापित राजकीयाना ही मोक्याची जमीन हवी आहे या प्रस्थापितानीच पोलीस प्रशासनास हाताशी धरून माझ्या विरोधात षडयंत्र रचून एमपीडीची कार्यवाही लाऊन मला 1 वर्षा साठी वाशिमच्या कारागृहात जेरबंद केले पण मा न्यायालयाने मला न्याय देऊन निर्दोष सोडले या आनंदाच्या निकाला नंतर माझ्या वर विश्वास ठेवणारे प्रेम करणाऱ्या मित्र परिवारांनी माझे स्वागत केले या विरोधात पोलिसांनी पुन्हा कायद्याचा बडगा उजारत 135 कलमांतर्गत गुन्हा नोंद केला माझ्या वरील एकूण 8 गुन्ह्या पैकी 5 गुन्ह्यात माझी मा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलीली आहे उर्ववीत 3 गुन्हे मा न्यायालयात प्रलंबीत आहेत
मला सर्वसामान्य जीवन जगू द्या------ सलीम पहेलवान.
मी कायद्यावर न्याय व्यस्थेवर विश्वास ठेवणारा सर्व सामान्य नागरिक असून मला पण सर्व सामान्य नागरिका प्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे असे जीवन मला जगू द्यावे अशी मानसिकता त्यांनी व्यक्त केली मी कोणताच ड्रग माफिया नाही किंवा माझ्या मुळे शहरात कोणतेच जातीय दंगे झालेले नाही मी शहराचा नगर उपाध्यक्ष राहिलेलो आहे सद्या माझा मुलगा नगरसेवक आहे सर्वसामान्य नागरिक माझ्या खंबीर पाठीशी आहे न्याय व्यस्थेवर माझा विश्वास आहे असेही शेवटी सांगितले या पत्रकार परिषदेस सलीम पहेलवान याचे नगरसेवक सुपुत्र इस्माईल सह अजगर खा पठाण रहीमखा पठाण अमन पहेलवान सऊदी चाऊस दादामियाँ पठाण अनवरखा पठाण उपस्थितीत होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें