टिपू सुल्तान एक देशभक्त व महान योध्दा होते : अमोल मिटकरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 22 नवंबर 2018

टिपू सुल्तान एक देशभक्त व महान योध्दा होते : अमोल मिटकरी.


भोकरदन प्रतिनिधी : शहीद टिपू सुल्तान यांच्या जयंती निमित्ताने भोकरदन शहरात मुस्लिम युवकांतर्फे पोलीस स्टेशन समोर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते अमोल दादा मिटकरी यांचा व्यवस्थापन समिती तर्फे  प्रेषित मोहम्मद (सल्ल) जिवन चरित्र पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  माजी.नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, माजी.उपनगराध्यक्ष शफीक सेठ,माजी. माजी उपनगराध्यक्ष नजीर मदनी , जिप सदस्य केशव जंजाळ,सत्तार सेठ,त्रिंबकअप्पा पाबळे,हमदु चाऊस ,मो. शरूख, सुरेश तळेकर, मराठा सेवा संघ अध्यक्ष बबन जंजाळ , एस .बी. मेव्हा नेव्हार , संभाजी ब्रिगेड विष्णू लोखंडे , वामन जंजाळ,सोपन सर,मुजीब हाजी,श्रावण कुमार अक्से,ऐजास सेठ,नईम कादरी,मुमताज मदनी ,मोईस सिद्दीकी, शेख मुक्तार,रामेश्वर जंजाळ, एकबाल सिद्दीकी, जैन संघटनेचे संतोष अन्नदाते,रमेश जाधव,माळी महासंघ चे राजेंद्र दारूंडे आदि उपस्थित होते.यावेळी प्रमुख वक्ते मुलूखमैदानी तोफ अमोल दादा मिटकरी यांनी आपल्या भाषणातून शहीद स्वातंत्र्य सैनिक टिपू सुल्तान यांच्या कार्यावर भाषण करतांना सांगितले की,शहीद टिपू सुल्तान यांचा देशासाठी योगदान अविस्मरणीय आहे.आणि शहीद टिपू सुल्तान यांनी देशासाठी आपले प्राण पण त्याग केले.आमच्या देशाला पहिले मिसाईल शहीद टिपू सुल्तान यांनी दिले.त्यांच्या काळात कधी जातीय दंगली झाल्या नाही,हिंदू मुस्लिम सर्व समाजाला त्यांनी न्याय देण्याचा काम केला, त्यांच्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही .आपल्या शेवटच्या श्वसापर्यंत देशाच्या रक्षणासाठी लढले त्यांनी इंग्रेज्यांच्या विरोधात पहिले योद्ध पुकारले ते इंग्रेज्यांच्या विरोधात योद्ध लढतांना शहीद झाले होते असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. जावेद रब्बानी यांनी  कार्यक्रम ची प्रस्तावना केली तसेच अब्दुल्ला चाऊस यांनी टिपू सुल्तान  समाजातील लोका साठी प्रेरणा असुन या विषयी आपले मनोगत व्यक्त केले व अभार प्रदर्शन शेख सलिम यांनी मानले .  कार्यक्रम यशस्वी कारण्यासाठी नगरसेवक नसीम पठाण,नगरसेवक अब्दुल कदिर ,मुजीब कादरी,आसिफ कुरेशी,महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचे शेख सलिम, नुझेर शाह,शेरखान,जावेद शेख,इसरार पठाण,अमन ग्रुप चे  इरफान पठाण,झहीर भाई,जावेद पठाण,सय्यद सोहेल,आदिंनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें