सेलू येथील डाक कार्यालयात अल्पबचत व ग्राहक संवाद मेळावा संपन्न... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 20 नवंबर 2018

सेलू येथील डाक कार्यालयात अल्पबचत व ग्राहक संवाद मेळावा संपन्न...



सेलू प्रतिनिधी

सेलू :- येथे शनिवारी सेलू डाक कार्यालयाच्या अंतर्गत येणार्या डाक कर्मचारी व एजन्ट चा मेळावा सेलू येथे आयोजित करण्यात आला. यामध्ये नव्याने रूजू झालेले कर्मचारी व पिएलआय प्रतिनिधीचा सत्कार करण्यात आला
यावेळी व्यासपीठावर सेलू पोस्टमास्तर शेख ईरशाद, सेलू टाऊनचे पोस्टमास्तर रामप्रसाद तालडे,उप पोस्टमास्तर सुरेश सातोनकर, अशोक कासार,मनोहर कलालडे,पीएलआय प्रतिनिधी शंभू काकडे होते
यावेळी नव्याने शाखा डाकपाल म्हणून रूजू झालेल्यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी पोस्टमास्तर शेख ईरशाद मार्गदर्शनपर बोलताना म्हणाले की, भारतीय डाक विभागावर लोकांचा प्रचंड विश्वास असून त्याच प्रमाणे आपण काम करत आहोत त्यामुळेच लोकांनी पोस्टात आपले पैसे गुंतवणूक करत आहेत. आता तर पोस्टाची बॅंक आली असल्याने आपणास आता झपाट्याने काम करावे लागेल. भारतीय डाक विभागाचे ग्राहकांना अधिक-अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी आधुनिकीकरण होत आहे.
सेलू डाक घर च्या अंतर्गत नव्याने रूजू झालेले कर्मचारी व एजन्ट तरूण असल्याने चांगला व्यवसाय खेचून आणतील अशी माझी अपेक्षा आहे.
आपण चांगले उद्दिष्ट पूर्ण केल्यास परभणीच्या डाक अधीक्षक मार्फत आपला सत्कार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले...
टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा यांचे महत्व पटवून देण्यासाठी लवकरच मेळावा घेणार असल्याचे पोस्टमास्तर म्हणाले

या मेळाव्यास पोस्टमन संजय वीर, यशवंत वाईकर, मुंडे, शाखा पोस्टमास्तर उध्वराव बोराडे, भागवत लिखे,गजानन काळे,भागवत गिरी,बळीराम काळे,अल्पबचत प्रतिनिधी संजय मनियार,रत्नाकर देशमुख,काला,माजी पोस्टमास्तर शिवाजीराव रोडगे सह सर्व शाखा पोस्टमास्तर,कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते

नव्याने रूजू झालेले कर्मचारी.चिकलठाणा- शितल तांबे,नवनाथ रेड्डेवार,कुंडी-प्रशांत घोडके मोरेगाव-स्वाती निकाळजे.सेलू कार्यालयासाठी -राम शिलक्ये सेलू टाऊन कार्यालयासाठी-हिवरे मनिषा.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें