सिल्लोड (प्रतिनिधी)दि 21/11/2018.
सिल्लोड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असुन अन्न - धान्याचा प्रश्नही बिकट झालेला आहे. सिल्लोड तालुक्यातील अनेक शिधापञिकाधारकांना धान्यच मिळत नाही. सिल्लोड तालुक्यातील सर्व शिधापञिकाधारकांना धान्य उपलब्ध करुन देण्याची मागणी करणारे निवेदन भराडी येथे आ.अब्दुल सत्तार यांना स्वस्त धान्य दुकानदार - केरोसिन परवानाधारक संघटनेकडून करण्यात आली. यावेळी माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार यांनी शिधापञिकाधारकांचा प्रश्न खुपच गंभीर असुन हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे सांगितले.
यावेळी यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,देविदास पाटील लोखंडे,महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दामुआण्णा गव्हाणे, राजुमिया देशमुख,मनोज जैस्वाल,निजाम पठाण,अर्जुन गाढे ,तसेच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रफिक पठाण शेरखा, पंडित पारधे,जितेंद्र माहोर,प्रभाकर वाघ,राधेश्याम कूलवाल,मधूकर बर्डे,सलिम बागवान,संजय पाटील,भगवान काथार,यांच्यासह अनेक स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें