रस्ता मजबुतीकरण - डांबरीकरण कामांचे आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उदघाटन;
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 21/11/2018.सिल्लोड तालुक्यातील भराडी - आमठाणा - घाटनांद्रा - तिडका रस्त्याचे मजबुतीकरण - डांबरीकरण नुतनीकरण कामांसाठी 4 कोटी 70 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून ही कामें तात्काळ सुरु करा असेही संबंधित अधिका-यांना सांगण्यात आले. रविवार (दि 18)रोजी सदरील कामांचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
भराडी - आमठाणा येथील चौफुली रस्त्यावर या कामांचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,देविदास पाटील लोखंडे,महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दामुआण्णा गव्हाणे, राजुमिया देशमुख,मनोज जैस्वाल,निजाम पठाण,अर्जुन गाढे, सिमाताई गव्हाणे,संजय बन्सोड,भागवत मोरे,हरिदास दिवटे,रघुनाथ मोरे,मुनिफ सौदागर,बाळा तायडे,नामदेव जाधव,बाबासाहेब देशमुख,देविदास आमटे,नंदू दिवटे,ज्ञानेश्वर तायडे,हरिदास ताठे,युवराज तायडे,नंदू दांडगे,फकिरराव तायडे,मोईन शेख,काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें