नवरात्रोत्सव निमित्त,श्रीराम कथा यज्ञ सोहळा.तिडी पिंपळगाव ग्रामस्थांचा उपक्रम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 13 अक्टूबर 2018

नवरात्रोत्सव निमित्त,श्रीराम कथा यज्ञ सोहळा.तिडी पिंपळगाव ग्रामस्थांचा उपक्रम.



सेलू प्रतिनिधी

सेलू ः तालुक्यातील तिडी पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने येथील जगदंबा
देवी नवरात्रोत्सव निमित्त १० ते १ ऑक्टोबर दरम्यान
श्रीराम कथा यज्ञसोहळ्याचे आयोजन करण्यात आले
असल्याची माहिती संयोजकांनी दिली मागील अनेक ४ वर्षापासून तिडी पिंपळगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने जगदंबा देवीच्या मंदिरा समोर विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी १० ते १७ ऑक्टोबर दरम्यान श्रीराम कथा यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सिंदखेडराजा येथील
रामायणाचार्य अनिल महाराज चेके हे श्रीराम कथेचे संगीत विवेचन करत
आहेत. दररोज दुपारी १ ते ५ या वेळेत होणार्या संगीत रामकथा श्रवणासाठी
पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी होत आहे. संगीत कथेला मृदंगाचार्य
राम महाराज काजळे, अरूण महाराज मोरे, अशोक महाराज जाधव, अनंत महाराज वाघमारे, राम गायकवाड तर गणेश वाघमारेमहादेव भिसे, खंडेराव घुमरे, किशनराव जोगदंडविणेकरी बाबासाहेब जोगदंड आदी साथसंगत देत आहेत. दरम्यानच्या काळात रात्री ८ ते १० या वेळेत दररोज हरिकिर्तने
आयोजित करण्यात आले आहेत. गुरुवार १८ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराजांचे सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे किर्तन होणार आहे. महाप्रसादानंतर महोत्सवाची सांगता
होणार आहे. कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जगदंबा देवी
नवरात्र महोत्सव तिडी पिंपळगाव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें