सेलू प्रतिनिधी.
पाथरी आगाराच्या एका नादुरुस्त बस आणि खराब रस्त्यामुळे सेलू देऊळगाव गात दरम्यानच्या प्रवासात बसच्या सीट खालील पट्टी घुसल्यामुळे विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवार 9 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली याबाबतची माहिती या प्रमाणे तालुक्यातील देऊळगाव गात येथील विद्यार्थी लखन संजय कदम वय 14 हा येथील नूतन विद्यालयात इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत आहे देवळगाव गात येथून शाळेत जाण्यासाठी रोजच्या प्रमाणे मंगळवार ९ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता देऊळगाव गात येथून बस क्रमांक एम एच 20 डी 9854 मध्ये बसून येत असताना खिळखिळ झालेल्या या नादुरुस्त बसमध्ये आणि खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कमरेखाली बसच्या शीट मधून निघालेली पट्टी घुसली आणि तो जोराने किंचाळला घडला प्रकार विद्यार्थ्यासह वाहकास सांगण्यात आला या विद्यार्थ्यास लोखंडी पट्टी घुसल्यामुळे मोठी इजा झाली त्यास रुग्णालयात दाखल करून या जखमीवर चार टाके पडले आहेत विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका उपाध्यक्ष शिवराम कदम यांनी कळली घडल्या प्रकाराबद्दल त्यांनी सुरू बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक व पाथरी आगाराचे एटीएस सूर्यवंशी यांना चांगलेच खडसावले हा प्रकार नादुरुस्त बस आणि खराब झालेल्या रस्त्यामुळे घडला आहे दरम्यान ज्या नादुरुस्त बस मुळे ही घटना घडली ती बस परत रस्त्यावर पाठवू नये अशा सूचनाही पाथरी आगाराचे एटीएस सूर्यवंशी यांनी चालकासह संबंधितांना दिली आहे
श्रेयासाठी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आडले
सेलू ते डासाळा हा रस्ता देवळगाव फाट्यापासून खूपच खराब झाला आहे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रोजच अपघात होतात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मध्यंतरी परभणी जि प चे गटनेते राम खराबे पाटील यांनी आंदोलन केले होते परंतु रस्ता मात्र दुरुस्त झाला नाही डासाळा जि प सर्कल शिवसेनेच्या वर्चस्वाखाली आहे रस्त्याचे काम झाल्यास याची श्रेय जि प गटनेते खराब यांना जाईल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे विरोध करतात ्म्हनुन मागील चार वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे असे छोटे-मोठे अपघात घडल्यास लोकप्रतिनिधीच्या श्रेयासाठी रस्त्याच वेठीस धरल्याची भावना परिसरातील लोकांची आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें