सेलू प्रतिनिधी शमशेर खान.
सेलू तालुक्यातील राजवाडी येथील उपसरपंच राजकिशोर जैस्वाल यांचे पद तिसर्या अपत्यामुळे अपात्र ठरले असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिला आहे. राजवाडी येथे ऑगस्ट २०१६ मध्य ग्रामपंचायत निवडणुक होऊन नागरिकांच्या मागास प्रवर्गातन राजकिशोर मदनलाल जैस्वाल हे निवडुन आले होते.त्यावेळी त्यांना दोन अपत्य होती.११ जुलै २०१० रोजी त्यांना तिसरे अपत्य झाले. याबाबत कुलदिप प्रभाकर शेवाळे यांनी ६ जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे २३ एप्रिल २०१८ रोजी अर्ज दाखल केला होता. यावेळी
गैरअर्जदार यांच्या वतीने
राजकिशोर मदनलाल जैस्वाल व राजकिशोर शिवप्रसाद जैस्वाल या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत.तसेच तिसरे अपत्य हे राजकिशोर मदनलाल जैस्वाल यांचे नाही असा युक्तीवाद करण्यात आला. परंतु राजकिशोर मदनलाल जैस्वाल वं राजकिशोर शिवप्रसाद जैस्वाल या
दोन्ही व्यक्ती एकच असून त्यांना तिसरे अपत्य झालेले आहे हे अर्जदार यांच्या वकीलामार्फत सबळ पुराव्यानिशी मांडण्यात
या प्रकरणात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ज-१) अन्वये जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर यांनी
शनिवार ६ ऑक्टोबर रोजी निर्णय देवून राजकिशोर मदनलाल जैस्वाल यांना पदावरुन अपात्र
ठरविले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें