चिञकला,निबंध स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद सेलू तालुक्यातील अकराशे विद्यार्थी सहभागी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 6 अक्टूबर 2018

चिञकला,निबंध स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद सेलू तालुक्यातील अकराशे विद्यार्थी सहभागी .



सेलू प्रतिनिधी.
सेलू : येथील नूतन विद्यालयाच्या केंद्रावर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय चिञकला आणि निबंध स्पर्धा विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादात शनिवार (०६ रोजी ) संपन्न झाली. नूतन विद्यालय,नूतन कन्या प्रशाला,न्यु हायस्कूल,यशवंत विद्यालय,जिल्हा परिषद प्रशाला देऊळगाव गात,जिल्हा परिषद प्रशाला गुगळी धामणगाव इत्यादी शाळेतील अकराशे विद्यार्थी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अंतर्गत असलेल्या या चिञकला स्पधेसाठी निसर्ग निर्मित आपत्ती पूर,भुकंप,वनवा,दरड कोसळणे,तर निबंध स्पर्धेसाठी मानव निर्मित आपत्ती अपघात,आग,गर्दीतील चेंगराचेंगरी,बॉम्ब स्फोट हे विषय होते. प्राथमिक गट पाचवी ते आठवी,माध्यमिक गट नववी ते बारावी या दोन गटात ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेच्या उद् घाटन प्रसंगी मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी,उपमुख्याध्यापक अशोक गाजरे,पर्यवेक्षक मा.मा.सुर्वे,आर.जी.मखमले,कें प्रमुख सय्यद सरदार, मुख्याध्यापक भुजंग थोरे, चिञकला स्पधेचे तालुका संयोजक किशोर कटारे,निबंध स्पर्धेचे संयोजक सुरेश हिवाळे यांची उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वीतेसाठी वाय.एफ.पठाण,वसंत डख,कविता सोनटक्के,मंजुषा बोथेकर,विराज कडगे,फुलसिंग गावित,विशाल धापसे,सत्यनारायण ताठे यांनी परिश्रम घेतले.सुञसंचालन आणि आभार प्रदर्शन सुरेश हिवाळे यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें