कौसडी/प्रतिनिधी
जिंतुर तालुक्यातील कौसडी व परिसरातील शेतक-यांनी सोयाबीन पीकाची लागवड दरवर्षी प्रमाणे या वर्षी जास्त केली असुन वेळेवर पावसाने साथ दिली नसल्यामुळे 20 ते 30 टक्के सोयाबीन जळाले असुन रूरलेले 70 ते 80 टक्के सोयाबीन पिकाची काढणीला सुरवात झाली असुन शेतकरी सोयाबीनची काढणी व खळा झालेकी शेतातुन सोयाबीन विक्रीसाठी कौसडी बाजरपेठेत आणत आहे मात्र व्यापारी शेतक-यांचे सोयाबीन कवळीमोल भावने खरेदी करतांनी दिसत आहे
मागील पांच वर्ष पासुन शेतकरी दुष्काळात होरपळत आहे पेरणीचे दिवस आलेकी शेतकरी बँकेतुन व खाजगी सावकाराकडुन कर्ज काढुन पेरणी करत आहे वेळोवेळी रासायनिक खत चांगल्या दर्जेचे औषधी वापरून दिवस रात्र शेतात राबुन चांगेले उत्पन्न होईल ही आशा करत आहे वरून पावसाची पन साथ मीळत नाही या मुळे सर्वच पिकाच्या उत्पन्नात घट झाली असुन कसेतरी सोयाबीन चे उत्पन्न थोडेफार हातात आले मात्र व्यापरी कवडीमोल भावाने खरेदी करत आसल्याने शेतक-यांच्या पदरात काहीच येत नाही कौसडी बाजरपेठेत सोयाबीनची खरेदी प्रति क्विंटल 2200 शे रूपये पासुन ते 2700 शे रूपया पर्यंत खरेदी केली जात आहे
शेतक-याला एक ब्याग सोयाबीन काढणीसाठी मजुरांना 2700शे ते 3000 रूपये द्यावे लागते व तेच सोयाबीन मळणीयेत्रातुन काढण्यासाठी 1000 ते12000 मोजावे लागते सोयाबीनच्या एका ब्यागेला 4 क्विंटल सोयाबीनचा उतार येत आहे
शेतक-यांनी एक ब्याग सोयाबीनची लागवड केल्या पासुन तर मळणीयंत्रतुन काढण्या पर्यंत 11500 रूपये खर्च लागतो.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें