सेलू प्रतिनिधी
सेलू क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा साँफ्टबाँल असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू यांच्या वतीने शालेय विभागीय साँफ्टबाँल क्रीडा स्पर्धा उद्घाटन दि. 11आँक्टोबर रोजी नूतन विद्यालय क्रीडांगण वर उपविभागीय अधिकारी मा. उमाकांत पारधी यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घटन प्रसंगी पारधी म्हणाले की अपयश हि यशाची पायरी आहे, खेळाडू नी मैदानावर आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून यश संपादित करावे.
कार्यक्रम अध्यक्ष स्थानी नूतन संस्था सचिव डी.के.देशपांडे जिल्हाक्रीडाधिकारी कलीमोउद्दीन फारुखी, मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, अशोक गाजरे, मा.मा.सुर्वे, आर.जी.मखमले , प्रकाश होनवडरकर, साँफ्टबाँल सचिव प्रसेनजित बनसोडे, आदी उपस्थित होते. स्वागतगीत सचिदानंद डाखोरे व संच यांनी "खेळ खेळुया देशाची शान वाढुया" या गीताने खेळाडू व पाहुण्यांने भारावून गेले.
कार्यक्रम चे सुत्रसंचालन प्रा नागेश कान्हेकर,तर आभार प्रदर्शन डी.डी.सोन्नेकर यांने मानले.
स्पर्धेतील सर्व खेळाडू ना नूतन विद्यालय च्या वतीने फुलावा व स्विट, पाणी देण्यात आले.
17 मुले व मुली गटातील 10 जिल्हा संघानी सहभाग नोंदवला.
स्पर्धेत मुलीच्या गटात गांधी वि.परभणी (मनपा )विजयी तर नूतन कन्या प्रशाला सेलू (परभणी ग्रामीण उपविजयी) मुलाच्या गटात शिवछत्रपती मा.वि. औरंगाबाद (औरंगाबाद ग्रामीण)विजयी तर नूतन विद्यालय सेलू (परभणी ग्रामीण) उपविजयी ठरला.यशस्वी साठी गणेश माळवे, प्रशांत नाईक, के.पी.राठोड, सतिश नावाडे, किशोर ढोके, पी.आर.जाधव यांनी परीश्रम घेतले.
स्पर्धेस पंच म्हणून ओंकार खोत, गणेश दिक्षित, अंगद सुतारे, श्रीकांत शिर्के, इम्तियाज मंहमंद ,सुरेश काळे, स्नेहा घोंबाळ नागसेन आटकोरे, सह्याद्री घोंबाळे, यांनी काम पाहिले.
फोटो ओळी:-शालेय विभागीय साँफ्टबाँल स्पर्धेच उदघाटन करताना उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, संस्था सचिव डी. के.देशपांडे,जिल्हाक्रीडाधिकारी कलीमोउद्दीन फारूखी, मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, अशोक गाजरे, सुर्वे मा.मा. आर.जी.मखमले, गणेश माळवे, प्रसेनजित बनसोडे, डी. डी. सोन्नेकर.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें