“बालपणातील वाचन हे केवळ वाचन नसते ; ती एका सेतूची निर्मिती असते.”= राजेश खेडकर ,ग्रंथमित्र,सोनपेठ. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 12 अक्टूबर 2018

“बालपणातील वाचन हे केवळ वाचन नसते ; ती एका सेतूची निर्मिती असते.”= राजेश खेडकर ,ग्रंथमित्र,सोनपेठ.

'पुस्तकभिशी ' उपक्रमास दीपक कुलथे यांची 501 रुपयांची भेट.


वालुर.प्रतिनिधीदि.12/10/2018.

    तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी येथे बाल सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचीअध्यक्ष म्हणून वर्ग तिसरी ची विद्यार्थिनी कुमारी अर्चना राजे भाऊ राठोड ही होती .तर, बाल सभेचे प्रमुख अतिथी म्हणून ग्रंथ मित्र म्हणून ओळखले जाणारे माननीय राजेश खेडकर, सोनपेठ हे उपस्थित होते. माननीय अन्वर पठाण , दीपक कुलथे मानवत, गावचे सरपंच माऊली राठोड ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल आडे, साहेबराव लघें व शाळेची मुख्याध्यापक उपस्थित होते.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक  मैफळ  यांनी केले ।प्रास्ताविकात शाळेच्या विकासासंदर्भात व मुलांच्या गुणवत्तेसंदर्भात राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाविषयी त्यांनी उपस्थित मान्यवरांना माहिती सादर केली.
याप्रसंगी मनीषा राठोड या विद्यार्थिनीने शाळेत राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची सविस्तर माहिती सादर केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राजेश खेडकर यांनी आपल्या मनोगतात बालपणातील आठवणींना उजाळा दिला. याच प्रसंगी राजेश खेडकर यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. राधा शेळके व काजल राठोड या दोन विद्यार्थिनींनी त्यांची मुलाखत घेतली.
याप्रसंगी राजेश खेडकर यांनी विद्यार्थ्यांना ग्रँथाचा चा सहवास किती अमूल्य असतो. ग्रंथांच्या सहवासामुळे माझ्या जीवनात झालेला अमुलाग्र बदल कसा आहे याची सविस्तर माहिती मुलांना दिली. ग्रंथपाल म्हणून काम करत असताना अनेक शाळेतील चिमुकल्याने पर्यंत ग्रंथांस देणं .या माध्यमातून तुमच्या सारख्या अनेक आनंदाच्या झाडांना मला आनंद देण्याचा भाग्य लाभला. मुलांनो एवढ्या बालपणापासून आपण पुस्तक वाचत आहात याचा मला खूप कौतुक वाटत आहे .जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी येथील आनंदाच्या झाडांना मी वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे पाहत असतो .आज प्रत्यक्ष तो योग आला आहे.आज तुम्ही माझी जाहीर मुलाखत घेतली माझ्या जीवनातील अनेक प्रसंग तुम्ही ऐकून घेतला ,अनुभव ऐकून घेतलात. तुम्हाला एक सांगू इच्छितो "वाचन हा विद्यार्थ्यांचा दागिना आहे. हा दागिना ज्याने परिधान करेल त्याचं जीवन सुंदर दिसेल. बालपणातील वाचन हे केवळ वाचन नसतं ती एक सेतूची उभारणी असते. म्हणून आपण पुस्तकांसोबत जो लावलेला लळा आहे तो कायम राहू द्या असाच पुस्तक वाचत रहा. बुद्धीने सशक्त व्हा .बलवान व्हा…"

याप्रसंगी गावचे सरपंच माऊली राठोड यांनी राजेश खेडकर यांचे जाहीर आभार मानले. ते म्हणाले," आज आपण आमच्या विद्यार्थ्यांशी हितगुज साधण्यासाठी इतक्या दुरून आलात व माझ्या गावातील विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधला त्यांना त्यांच्या जीवनातील अनुभव सांगितला सोबत ग्रंथांचं दान दिलात. ही माझ्या चिमुकल्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही आपले सदैव ऋणी असू.
याप्रसंगी उपस्थित असलेले अन्वर पठाण व दीपक कुलथे यांनी विद्यार्थ्यांच्या वाचन वेडाच खूप कौतुक केलं .वेगवेगळ्या उपक्रमांच्या माहिती  ऐकून  भारावून गेलो असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सोबतच शाळेतील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी राजेश खेडकर व आलेल्या पाहुण्याचे, मान्यवरांची जाहीर आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज माने व नेहा राठोड यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंगेश नरसिंग कर यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी. श्याम रुपनर, संजय काकडे विठ्ठल शेळके सुभाष लंघे आदींनी सहकार्य केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें