भोकरदन शहरासह तालुक्यातील चालू असलेले भारनियमन बंद करण्यात यावे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सहाय्यक अभियंता यांना निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 12 अक्टूबर 2018

भोकरदन शहरासह तालुक्यातील चालू असलेले भारनियमन बंद करण्यात यावे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सहाय्यक अभियंता यांना निवेदन.



शेख सलिम

भोकरदन प्रतिनिधी : शहरासह तालुक्यात अचानक सुरू झालेल्या वीज भारनियमन संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्यात आले.एकीकडे नवरात्र उत्सव सुरू असल्याने उत्सवावर भारनियमनामुळे अंधाराचे सावट उभे टाकले आहे.तालुक्याका दुष्काळाच्या उंबरठ्यावर असतांना त्यात पुन्हा महावितरण कंपनीने सुरू केलेले भारनियमन. या भारनियमनाचा सर्वात जास्त फटका  ग्रामीण भागातील जनतेला बसला असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. सध्या भोकरदन शहरात व तालुक्यात अत्यंत अल्प पाऊस झाला आहे.या भारनियमन चा शाळकरी व कॉलेजच्या विध्यार्थ्यांना अभ्यास करताना फार मोठी अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.तसेच जनावरांना पाणी पाजण्यासाठी व इतर विविध कामांसाठी भारनियमन कमी करावे व कामाचे नाव सांगून काम चालू आहे असे सांगून बराच वेळ शहरात लाईट बंद असते ती सुरळीत चालू ठेवावी अश्या विविध मागणीचे निवेदन सहाय्यक अभियंता यांना देण्यात आले. निवेदनावर युवा नेते सुधाकर दानवे,शहर अध्यक्ष नईम कादरी,नंदू पाटील गिरहे, अरुण पा.तळेकर,ईश्वर पा. पांडे,जयंता जोशी ,फईम कादरी,सय्यद आरेफ आदींच्या सह्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें