सेलू प्रतिनिधी
भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती ,भारतरत्न, थोर शास्त्रज्ञ डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त दि.१५ ऑक्टोबर (सोमवार )रोजी वाचन प्रेरणा दिन सेलू तालुक्यातील खादगाव येथील श्री जगदंबा सार्वजनिक वाचनालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथालयाचे ग्रंथपाल ज्ञानोबा भाबट यांनी ए. पी. जे . अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला व वाचनाचे महत्व विशद केले.
ते पुढे म्हणाले की कलामांना मानवतेचे संस्कार ,स्वयंशिस्त ,प्रामाणिकपणा हे गुण आई वडिलांकडून प्राप्त झाले.स्वतःच्या कार्याप्रति अढळ विश्वास , महत्वकांक्षा व कार्याचा ध्यास ही शिदोरी घेऊनच कलाम यशस्वी झाले.प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिद्द न सोडता आपले कार्य पुढे चालू ठेवले.
वाचनाचे महत्व सांगताना म्हणाले की ,वाचनामुळे नवनवीन माहिती आपल्याला कळते, ज्ञान वाढते ,व्यक्तिमत्त्व विकास सहज शक्य होतो. आजची तरुण पिढी मोबाईलच्या आहारी जाऊन इंटरनेटवर आपला वेळ घालवत आहे हे चित्र बदलण्यासाठी व वाचन संस्कार रुजविण्यासाठी वाचन आवश्यक आहे ग्रंथालयाच्या माध्यमातून आपण वाचन करावे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी खादगाव येथील श्री जगदंबा सार्वजनिक वाचनालय चे ग्रंथपाल ज्ञानोबा भाबट, भाऊसाहेब भाबट, आश्रुबा बोराडे, भीमराव भाबट, भाऊराव भाबट, पंडित वावळ, ग्रंथालयाचे सेवक अंशीराम भाबट, सरपंच जगन्नाथ पालकर ,निलेश भाबट, सुनील भाबट, मधुकर भाबट, डॉक्टर इकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें