महिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 15 अक्टूबर 2018

महिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या.



परभणी : परभणीत महिलेने शरीर सुखासाठी तगादा लावल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सचिन मिटकरी असे या तरुणाचे नाव असून आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये महिलेने धमकी दिल्याचा उल्लेख केला आहे.
परभणीतील वसमत रोड येथील दत्त धाम येथे राहणाऱ्या सचिन मिटकरी या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सचिनने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात सचिनने महिलेच्या नावाचा उल्लेख केला आहे. 'त्या महिलेने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. माझे लग्न झाले आहे हे तिला माहित असूनही ती माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत होती. शरीरसंबंध ठेवले नाही तर बदनाम करण्याची धमकी ती महिला देत आहे. त्या महिलेचे आणखी दोन मुलांसोबत संबंध असून तिने माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला. याला कंटाळून आत्महत्या करत आहे', असे त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
लोकांना पाहिजे की असल्या आमानविक क्रूर नरभिक्षुकिन्ना दन्ड मिलावन्याचा प्रयत्न करावा जे नरबलि घेण्यात निपुण आहे दया होउ नये कारण ते दया चे पात्र असतात का ?

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें