वयोवृद्ध आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 7 अक्टूबर 2018

वयोवृद्ध आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत.

जिंतूर-सेलु तालुक्यातील शिवसेनेचे विधानसभा प्रमुख तथा जि.प.गटनेते राम नाना पाटील यांच्या हस्ते आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना १० हजार रुपयांचे मदत देण्यात आले.


सेलू प्रतिनिधी:-
सेलू तालुक्यातील तिडी पिंपळगाव येथील वयोवृद्ध शेतकरी चांगोजी काशिनाथ निर्वळ वय 60 वर्ष यांनी 30 सप्टेंबर रोजी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली होती याची तात्काळ दखल घेत जिंतूर-सेलु विधानसभाप्रमुख रामनाना पाटील यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना १० हजार रू.ची आर्थिक मदत करण्यात आली.
 शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन शेतकऱ्यांची मूले गणेश निर्वळ ,माणिक निर्वळ ,यांच्या कडे 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करुन सांत्वन केले.
यावेळी काशिनाथ घुमरे(मा.ता.प्रमुख)विठ्ठलराव जाधव,दादासाहेब आवटे,पांडुरंग घुमरे,सुनील देशमुख,दत्तराव भोसले व गावातील नागरिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें