बोरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरूध्द गुन्हा दाखल.
कौसडी/प्रतिनिधी
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील शेतक-याची बैल जोडी चोरट्यांनी पळवल्याची घटना शुक्रवार दिनांक 5 अक्टोबर रोजी मध्ये रात्री घडली असुन अज्ञात चोरट्यांन विरूध्द बोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील शेतकरी एकनाथ विश्वनाथराव बहीरट हे रोजनित्य नियमा प्रमाणे शेती मशागतीचे कामे आटोपुन बैल जोडी गोठ्यात बांधुन घराकडे जेवन करण्यासाठी आले होते व काही वेळाने शेताकडे मुक्कामी गेले असता गोठ्यामध्ये बैलजोडी दिसुन नाही आली या मुळे त्यांनी जवळपासच्या शेता मध्ये रात्री च्या वेळेस बैलजोडीची शोधाशोध केली आसता त्यांना कोठेही शेती परिसरात बैलजोडी दिसुन नाही आली या मुळे ते गावाकडे बैल जोडी पहाण्यासठी आले होते परंतु त्यांना घरी व गावातही बैलजोडी आलेली दिसुन आली नाही या मुळे शेतकरी बहीरट यांनी कुटुंबातील सर्वांना बैलजोडी शेतातुन गायब झाल्याची कल्पना दिली व घरतिल सर्वांनी त्याच वेळेस बैलजोडीच्या शोधासाठी कौसडी परिसरातील आजुबाजुच्या गावांना फेरफटका मारला परंतु बैलजोडीचा शोध कोठेही लागुन आला नसता घडलेल्या घटनेचा सर्व तपशील बोरी पोलीस ठाण्यात सांगुन अज्ञात चोरट्यांन विरूद्ध शेतकरी एकनाथ बहीरट यांच्या फीर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तापास बोरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें