जिंतुर.प्रतिनिधी.दि.14/10/2018.
जिंतूर येथील जय दुर्गा आश्रम शाळेतील मध्यमवर्गीय शिक्षक विष्णू राठोड यांची कन्या प्रियंका हिने बालपणी बघितलेले हवाई सुंदरीचे स्वप्नांना मेहनतीने जिद्दीने कष्टाने आज साकार केले.
मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रियांका येथे शालेय शिक्षण शहरातील शकुंतला बाई बोर्डीकर कन्या शाळेत झाले तर महाविद्यालयीन शिक्षण परभणीतील ज्ञानोपासक महाविद्यालयांत पूर्ण झाले. बालपणापासून प्रियंका ही अभ्यासू चिकित्सक व धाडसी स्वभाव असल्याचे तिचे वडील विष्णू राठोड हे सांगतात.
मुली देखील आई वडिलांचे नाव मोठे करू शकतात ते प्रियंकाने पुनश्च एकदा सिद्ध करून दाखविले आहे. प्रियंकाचे वडील जय दुर्गा आदिवासी आश्रम शाळेत शिक्षक आहेत व आई टेलर काम करते. तिने स्वतः मारला होता. तिच्या आईने असे सांगितले की ज्यावेळेस विष्णू सरांना पगार नव्हता त्यावेळेस प्रियांका व तिची आई हे दोघे शिलाई काम करून घर खर्च चालवत होते. एका दिवाळीला लोकांच्या इथे उजेडच उजेड आणि यांच्या घरात अंधार होता. त्यावेळेस प्रियांका म्हणाली होती आई आपल्याही घरात लवकर उजेड होणार आहे त्यासाठी फक्त आपण मेहनत केली गेली पाहिजे आणि या मेहनतीचं फळ आपल्याला नक्कीच भेटेल असे हे तिचे शब्द आज पूर्ण झाली आहे. आपले स्वप्न साकार करण्यासाठी तीन वर्षांपासून मेहनत करत स्वतः ऑनलाईन फॉर्म भरला होता. ति आज बेंगळुर या ठिकाणी गगन भरारी घेत आहे.
तिच्या या यशाबद्दल पूर्ण जिंतूर वासियांकडून विष्णू राठोड यांचे कौतुक होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें