पंचक्रोशीतील भावीक भक्तांना पावनारी डिघोळची त्रिवीदी देवी,मजबुत रस्ता नसल्याने करावी लागते तारेवरची कसरत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 14 अक्टूबर 2018

पंचक्रोशीतील भावीक भक्तांना पावनारी डिघोळची त्रिवीदी देवी,मजबुत रस्ता नसल्याने करावी लागते तारेवरची कसरत.



सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१४ऑक्टोबर २०१८.

पंचक्रोशीतील भावीक भक्तांच्या नवसाला पावनारी तालुक्यातील डिघोळ येथील त्रिवीदी देविची ख्याती आहे. शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त या ठिकानी देविच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असते. नवसाला पावनारी त्रिवीदी देविची ख्याती आसुन प्रतिवर्षाप्रमाणे येथे नवरात्र उत्सवात जागर, गोंधळ असे विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहे.
शहरापासुन सुमारे १० कि.मी.अंतरावर दक्षिणेस डिघोळ या गावी उंच डोंगरावर देवीचे पुरातन कालीन सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या गाभा-यात वेगवेगळया प्रकाराच्या तिन देवीच्या प्राणप्रतिष्ठा विराजमान मुर्त्या आसुन मुख्य मंदिराच्या गाभा-यात दोन देवीचे पाषाणी मुखवटे आहे. मुख्य मंदिरात माहूरच्या रेणुका मातेचे उपपिठ म्हणुन संबोधल्या जाणारी रेणुका मातेची मुर्ती विराजमान आहे. त्याच ठिकाणी बाजुला दुसरी देवी म्हणजे राणीसावरगावची राणुबाई स्थानापन्न आहे. गाभाऱ्याच्या बाहेरील डाव्या बाजुस तुळजापुरची तुळजाभवानी मातेची मुर्ती विराजमान आहे. या तीन देविच्या स्थळास त्रिवीदी देवी असे संबोधले जाते. मंदिराच्या सभामंडपामध्ये मोठा यज्ञकुंड आसुन नवरात्रामध्ये अष्टीमीच्या रात्री पुर्ण आहुती होम हवण केले जाते. हे मंदिर पुर्णत: हेमाडपंथी बांधलेले असुन अंदाजे ई.स. १६०० मध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी या देविची स्थापना केल्याचे जानकारांचे म्हणने आहे. या मंदिराच्या समोर दोन्ही बाजूस काळोबा व तोळोबा हे देवीचे रक्षक मुर्तीरूपात विराजमान आहेत. याठिकानी नवरात्रीमध्ये देविच्या गाण्याने आराधी जागरण करतात महाराष्ट्रातून दररोज ४०० ते ५०० भावीक दर्शनासाठी येथे येतात. मंदिरासमोर डोंगरावर दोन छोटेशे तलाव आहेत त्यास देवीचे कल्लोळ म्हणतात दर्शनासाठी येनारे भावीक मोठ्या भक्ती भावाने याठिकानी येवून भोजन करतात व कल्लोळातील पाणी तिर्थ म्हणुन पित आसतात. गेली अनेक वर्षापासुन या ठिकाणी नवरात्राच्या काळात अन्नदान केल्या जाते. नऊ दिवस भाविक भक्त मोठ्या संख्येने प्रसादाचा लाभ घेतात. पंचक्रोशीतील भावीक भक्त मोठ्या प्रमानात देविच्या समोर नतमस्तक होऊन आपल्या मनातील इच्छा मांडतात व त्या पुर्णही होतात. देवीचा नवस फेडण्यासाठी पुन्हा परत येत असतात त्या मुळे नवसाला पावनारी देवी आसे या स्थळास म्हंटले जात आहे.

पंचक्रोशीतील भावीक भक्तांना पावनारी डिघोळची त्रिवीदी देवी अशी ख्याती असलेल्या या देवी मंदिराला जाण्यासाठी आजही रस्ता नसल्यामुळे येथे येना-या भावीक भक्तातांना अनंत अडचणींंना सामोरे जावे लागते. सोनपेठ तालुका हा परभणी जिल्ह्यातील सर्वात शेवटचं टोक असल्या मुळे येथे कुठलाही अधिकारी वा पुढा-यांचे याकडे लक्ष नाही. येवढेच नाही तर तालुक्यातील पुढारी देवी मंदिराकडे जाना-या रस्त्याचा प्रश्नासंदर्भात जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची हालचाल करत नसल्यामुळे भक्तांकडून संतापाचे सूर निघत आहे. परंतु पंचक्रोशीतील भावीक भक्तांना येण्यासाठी येथे आजही मजबुत रस्ता नाही त्या मुळे भावीकांना कालव्याच्या  बाजूने जिव मुठित धरून वहाने चालवावी लागतात. सोनपेठ परळी रस्त्यावरून डिघोळ येथील त्रिवीदी मंदिराकडे जाण्यासाठी अंदाजे ३ किमी चा खडतर रस्ता असल्याने भाविक भक्तांची कसरत होतं आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें