सिल्लोड (प्रतिनिधी)दि 02/10/2018.
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महात्मा गांधींनी अहिंसात्मक व असहकार आंदोलनांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. जुलमी इंग्रज राजवटीस हाकलून लावण्यात माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनीही स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले होते असे मत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे,उपनगराध्यक्ष शकुंतलाबाई बन्सोड,माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ,शांतीलाल अग्रवाल,विक्रम दौड,राजरत्न निकम,लड्डू पटेल,संजय मुरकुटे,हाजी मोबिन पटेल,मधुकरराव बेंडाळे,गणेश डकले,एस.एल.गोराडे,मनोज झंवर,जमीर मुल्तानी,हाजी मोहम्मद हनिफ, भावराव दुधे ,गणेश काळे, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें