नगरपरिषद कार्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 3 अक्टूबर 2018

नगरपरिषद कार्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी ;

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात उत्कृष्ट कामे करणा-या कर्मचा-यांना नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वाटप ;


सिल्लोड : प्रतिनिधी (दि.02/10/2018)
सिल्लोड नगरपरिषद कार्यालयात महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वच्छता अभियान व सर्वेक्षण २०१८ मध्ये सामूहिकपणे उत्कृष्टपणे जवाबदारी पार पाडल्याबद्दल कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रपिता माहात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सिल्लोड येथील नगरपरिषद कार्यालयात स्वच्छ सर्वेक्षण - २०१८ अंतर्गत कामात उत्कृष्टपणे कामगिरी बजावल्याबद्दल नगरपरिषद कर्मचा-यांना नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते प्रशस्ती प्रमाणपञ वाटप करण्यात आले तसेच स्वच्छ सर्वेक्षण -२०१९ साठी अधिकारी - कर्मचा-यांसह सर्वांनीच मोलाची कामगिरी बजावित सिल्लोड नगरपरिषदेला देशातून पहिल्या क्रमांकाचा बहुमान मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केली.

महात्मा गांधींनी अहिंसात्मक व असहकार आंदोलनांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.जुलमी इंग्रज राजवटीस हाकलून लावण्यात माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनीही स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून स्वताला झोकून दिल्याची आठवणीला उजाळा दिला. नगराध्यक्ष अब्दुल समीर जयंतीनिमित्त अभिवादनपर बोलतांना म्हणाले राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या कार्याची ज्योत सदैव तेवत ठेवणे त्यांना खर्याअर्थाने आदरांजली ठरेल.

यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, उपनगराध्यक्ष शकुंतलाबाई बन्सोड,माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ, शेख मो.इसहाक, शांतीलाल अग्रवाल, राजरत्न निकम नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक कायंदे, उपमुख्याधिकारी अजहरखा पठाण,  सुनील गोराडे, ए एम पठाण, गणेश काळे, अनवर पठाण, लड्डू पटेल यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें