सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०३ऑक्टोबर २०१८
सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर हे कांही दिवसापूर्वी सोनार समाजाने परभणी येथे सेवा नरहरींची या कार्यक्रमासाठी गेले होते. त्याठिकाणी इंजिनिअर गोविंदराव आंबिलवादे यांच्याशी त्यांची भेट झाली होती. यावेळी सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. याचवेळी आंबिलवादे यांनी चळवळीस पुस्तके भेट देण्याचे अश्वासन दिले होते. बहुप्रतीक्षे नंतर आज दि.०३ऑक्टोबर रोजी परभणी येथून आगामी वाचन प्रेरणा दिनासाठी स्वखर्चाने अंकल पार्सलच्या एस.टी.पार्सलने पाठविलेली पुस्तके प्राप्त झाली. या अमुल्य ग्रंथभेटी बद्दल ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर यांनी गोविंदराव आंबिलवादे यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी दै.आदर्श गावकरीचे तालूका प्रतिनिधी शिध्देश्वर गिरी, दै.दलितवाणीचे तालुका प्रतिनिधी गजानन चिकणे, शिवसेना नेते भगवानराव पायघन, कन्हैयालाल वर्माउपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें