सोनपेठ (प्रतिनिधी)
कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ, पंडीतगुरू पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा, लोकमान्य महाविद्यालय वडवणी, जनविकास महाविद्यालय बनसारोळा व वसुंधरा महाविद्यालय घाटनांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन कोर्सेस माहीती व आवश्यकता या विषयावर कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात कार्यशाळा अंतर्गत दर्जा हमी कक्षा ( आयक्युएसी) च्या वतीने संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यकंटराव कदम तर उद्घाटक प्राचार्य डॉ.आर.एस. बांगर होते. मंचावर हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वर कदम, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, पाचार्य डॉ.आर. टी.बेदरे, प्राचार्य डॉ.के.एम.पवार हे होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.बांगर यांनी नियमित महाविद्यालयीन अध्यापनावर या कोर्सेसचा परिणाम होण्याची शक्यता आहे, परंतू असे कोर्सेस ही अपरिहार्यता आहे. त्यामुळे सर्वांनी सज्ज रहावे असे मत व्यक्त केले. तसेच अध्यक्षांच्या वतीने समारोप करताना प्राचार्य डॉ. पवार यांनी येणाऱ्या काळासाठी आपण अनुकुल बनवून सजग राहीले पाहीजे, असे मत व्यक्त केले. तसेच यावेळी एम. ओ. ओ. सी. या विषयी प्रा. डॉ. बी. एम. गोरे उदगीरकर यांनी मार्गदर्शन केले, या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते होते. ऑनलाईन कोर्सेस उपयुक्तता या विषयी प्रा. डॉ. रोहिदास नितोंडे यांनी मार्गदर्शन केले या सत्राचे प्राचार्य डॉ.ए.वाय.दळवे होते. अंतिम सत्रात प्रा. डॉ. डी.बी.निकाळजे यांचे मार्गदर्शन झाले, या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.के.एम.पवार हे होते.
यावेळी सुत्रसंचालन प्रा. डॉ. अनंत जाधव, प्रा विक्रम धन्वे, प्रा. डॉ. अलका देशमुख, प्रा. डॉ. सतिश कदम, प्रा. डॉ. संजय सोळंके, प्रा.सखाराम कदम यांनी तर आभार प्रा.डॉ.नरसिंग उदार, प्रा. डॉ.कणसे, प्रा.डॉ.मनिषा ससाणे, प्रा.डॉ.हरिभाऊ कदम यांनी मानले यावेळी अनेक सहभागीतांनी सहभाग नोंदवला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें