बदनापूर (प्रतिनिधी)
बदनापूर तालुक्यातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील डॉ.अब्दुल रहमान यांना भौतिकशास्त्र मध्ये पी. एच. डी पदवी प्रदान करण्यात आली. दिनांक 08ऑक्टोबर 2018 वार सोमवारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड याठिकाणी (viva ) कार्यक्रम पार पडला. डॉ.अब्दुल रहमान यांनी भौतिकशास्त्र च्या Dielectric Relaxation and Hydrogen bonding interactions in aqueous solutions या संशोधन विषयामध्ये पी.एच.डी, प्रोफेसर अशोक सी. कुंभारखाने यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले .
डॉ.अब्दुल रहमान हे सध्या बदनापूर तालुक्यातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात भौतिकशास्त्र या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत तसेच यांनी सेट ,नेट ,गेट आणि एम. पी. एस. सी. परीक्षा ही उत्तीर्ण केलेली आहे.
डॉ.अब्दुल रहमान यांच्या या यशाबद्दल सार्वत्रिक कौतुक करण्यात येत आहे तसेच यावेळी संस्था , प्राचार्य, तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांनी पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें