वालुर.प्रतिनिधी.दि.16/10/2018.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाहीत अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती / सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करायचा आहे.वालुर येथील भाग क्र.237 येथील ज्या मतदाराचे नाव यादित नव्हते आशा मतदारांचे नविन मतदार यादित नाव नविन समाविष्ठ करण्याचे परिपुर्ण भरलेले तब्बल 28 अर्ज आज दि.16/10/2018 रोजी वालुर येथील यादि भाग क्र.237 चे बिएलओ गोविंद रोकडे सर यांना देण्यात आले यावेळी अनवर पठान(सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार),शे.कलिम,सय्यद वसिम,शे अ.रहेमान(बाबा टेलर),शे.अज़मत,इम्रान कुरेशी,शे.मकसुद,शे.अकबर आदि.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें