सेलू प्रतिनिधी.
येथील श्रीराम कॉलनी परिसरात राहत असलेल्या एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता घडली या बाबतची माहिती या प्रमाणे येथील श्रीराम कॉलनी परिसरात राहत असलेल्या संजय व्यंकटराव भाबट वय 25 या तरुणाने मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास आपल्या राहत्या घरी घराच्या मागच्या रूम मध्ये लोखंडी पत्र्याच्या अडूस दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली सेलू पोलिस ठाण्यात जगन विठ्ठलराव भाबट यांनी दिलेल्या माहितीवरून गुंरन ६६/१८ कलम 174 नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी प्रेत सेलू च्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले शवविच्छेदना प्रेत नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले असून मयत तरुण संजय भाबट यांच्यावर मुळगाव खादगाव ता.सेलु येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे या तरुणांनी आत्महत्या नेमकी कशामुळे केली याचे कारण मात्र समजू शकले नाही .पुढील तपास जमादार उद्धव लाड ,उमेश बारहाते हे करत आहेत या घटनेमुळे खादगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें