वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने अब्दुल कलाम जयंती साजरी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 16 अक्टूबर 2018

वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने अब्दुल कलाम जयंती साजरी .


सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१५ऑक्टोबर २०१८
येथील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती  बसस्थानक परिसरात साजरी करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर पोटे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रंथवाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर हे होते.
भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वृत्तपत्र विक्रेता दिन व ग्रंथवाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने सोनपेठ वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व प्रवासी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अब्दुल कलाम यांच्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गजानन चिकणे व प्रा. डॉ. संतोष रणखांब यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रास्ताविक परमेश्वर जाधव, सुत्रसंचालन देवानंद सौंदळे यांनी तर आभार सुहास बागडे यांनी मानले. याप्रसंगी संघटनेचे सचिव माधवराव जगताप, शिवाजी कुंभारीकर, यु.टी.राठोड, रोहन कांबळे, संघपाल तुपसमिंद्रे, विशाल कसबे, अनुपम जडे, वैजनाथ पवार, बाळु अालाट, सौरभ बोकरे, पवन चव्हाण, आशोक जाधव, शुभम खंदारे, योगेश कांबळे, गंगाधर गवारे, यांच्यासह अनेक नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें