सोनपेठ (राजेश खेडकर) दि.१५ऑक्टोबर २०१८
येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयातील ग्रंथालय व इंग्रजी विभागाच्या वतीने आज दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून *वाचन प्रेरणा दिन* साजरा करण्यात आला. प्रथमत: भारतरत्न डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. परमेश्वर कदम यांच्या हस्ते झाले. तसेच ग्रंथालय व इंग्रजी विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या डॉ.कलाम यांच्यावरील *The Missile Man* पोस्टरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विठ्ठल जायभाये यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर व त्यांच्या साहित्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे होण्यासाठी डॉ. कलाम यांच्या पुस्तकातून प्रेरणा घ्यावी असे सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम, प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, पत्रकार सुधीर बिंदू, प्रा.डॉ.संतोष रणखांब आदी मान्यवरांसह महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ. अनंत सरकाळे यांनी केले .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें