श्री महालिंगेश्वर विद्यालयात 'वाचन' करून वाचन प्रेरणा दिन साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 16 अक्टूबर 2018

श्री महालिंगेश्वर विद्यालयात 'वाचन' करून वाचन प्रेरणा दिन साजरा.


सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१५ऑक्टोबर २०१८
येथील श्री महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती व यानिमित्ताने वाचन प्रेरणादिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे ज्येष्ठ सहशिक्षक डी.आर.गव्हाणे व सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे सदस्य तथा विद्यालयाचे सहशिक्षक सतिश भंडारे यांच्याहस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजनाने झाली. उपस्थित विद्यार्थ्यांनी यावेळी वाचन केले तर ग्रंथ वाचन चळवळीचे सदस्य सतिश भंडारे यांनी डॉ. कलाम यांच्याविषयी माहिती भाषणातून दिली.
या कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें