कै.बाजीराव देशमुख विद्यालय शेळगाव येथे सामूहिक ग्रंथवाचन व ग्रंथभेट देऊन वाचन प्रेरणा दिन साजरा.
सोनपेठ(राजेश खेडकर)दि.१५ऑक्टोबर २०१८तालुक्यातील कै.बाजीराव देशमुख विद्यालय शेळगाव येथे सामूहिक ग्रंथवाचन, ग्रंथभेट करून माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कै.बाजीराव देशमुख विद्यालयात आयोजित कार्यक्रमात शाळेचा माजी विद्यार्थी आजीम कुरेशी यांने विद्यालयास ग्रंथभेट केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सोनपेठ तालुक्यातील ग्रामीण कवी अ.ह.रोडे यांची उपस्थिती होती. यावेळी सामूहिक ग्रंथवाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शाळेचे शिक्षक सत्यशील खंदारे, ओंकार जाडे, शिवाजी पाटील, ओमप्रकाश लष्करे, महेश जाधव, संतोष मेहत्रे, धम्मानंद खंदारे, भक्तराज गांगर्डे आदींसह विदयार्थ्यांची उपस्थित होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक गांगर्डे यांनी केले तर सहशिक्षक ओमप्रकाश लष्करे यांनी आभार व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें