नियमनमुक्ती च्या निर्णयाचे शेतकऱ्यांनी फटाके फोडुन केले स्वागत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 29 अक्टूबर 2018

नियमनमुक्ती च्या निर्णयाचे शेतकऱ्यांनी फटाके फोडुन केले स्वागत.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२९ऑक्टोबर २०१८.

राज्य शासनाने शेतीमाल नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला असुन या निर्णयाचे स्वागत शेतकऱ्यांनी फटाके फोडुन व मिठाई वाटुन केले.
भाजीपाला फळे व फुले नियमनमुक्ती नंतर पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने सर्वच शेतमाल नियमन मुक्त करण्याची मागणी लावुन धरली होती. सदाभाऊ यांच्या मागणीस राज्यसरकारने सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने शेतीमाल नियमन मुक्त केल्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी शेतकरी संघटना अनेक वर्षापासुन संघर्ष करत आहेत. सोनपेठ शहरातील शिवाजी चौकात शेतकऱ्यांनी नियमनमुक्तीच्या निर्णयाचे स्वागत फटाके फोडुन व मिठाई वाटुन केले. या वेळी राज्यशासन व पणन मंत्री सदाभाऊ खोत यांच्या अभिनंदनाचा ठराव ही प्रशासनास देण्यात आला. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळण्याची ही पहिली पायरी असल्याचे मत शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू यांनी व्यक्त केले असुन यावेळी शेतकरी संघटनेचे माधव जाधव ,सोमनाथ नागुरे, सुर्यकांत कदम, केशव मोहिते, गोपीनाथ भंडारे, मुंजा तेलभरे, द्वारकदास तेलभरे, देवीदास भुजबळ, माणिक काळे, दत्ता पवार यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें