सेलू प्रतिनिधी
युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असुन त्यामुळे देशाची युवा पिढि व्यसनाधिन होऊन अशक्त व कमकुवत होत असल्यामुळे देशाच्या विकासावर विपरित परीणाम होत असल्यामुळे युवक व ईतरांना व्यसनापासुन परावृत्त करण्याच्या उद्देशाने जमात -ए - ईस्लामी हिंद च्या देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणुन शाखा सेलूच्या वतिने राष्ट्रपिता म.गॉधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून " नशे का नाश, देश का विकास " या मोहीमे अंतर्गत व्यसनाचे दुष्परीणाम या बाबत शहरात ठिक ठिकाणी कॉर्नर मिटिंग घेण्यात आल्या. या मोहीमे अंतर्गत व्यासनाचे सामाजिक, शारीरीक, परीवारीक, अर्थिक, मानसिक दुष्परीणाम या बाबत सामाजिक कार्यकर्ते शेख महेमुदसर, जमिएतचे नोमान निजामी यांनी माहीती देऊन जनजागृती केली. सदरील सप्ताह यशस्वि करण्यासाठी जमात -ए- ईस्लामी हिंदचे मोईन सिद्दिकी, शोहेब हाश्मी, बिलाल हारमैन,शेख मजिद, शेख जुबैद, शेख गुफरान अदिंनी सहकार्य केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें